
Picture Credit : mahasscboard website
दहावीचे हॉलतिकिट ऑनलाईन कसे प्रिंट करावे
या वर्षांपासून मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. आजपासून (दि. ३०) पासून ते उपलब्ध होणार आहे
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या खालील वेबसाईट वर जाऊन ते डाउनलोड करावे .
अथवा
ह्यासाठी शाळेला देण्यात आलेल्या लॉग-इन आयडी व पासवर्ड चा वापर करून शाळा हॉलतिकिट डाउनलोड करू शकतील.
▪ जर काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा
▪ शाळांनी इयत्ता दहावी परीक्षेची ऑनलाईन हॉलतिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावी
▪ प्रिंटिंगसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेता येणार नाही
▪ हॉलतिकिटाची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यावी
▪ विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे
▪ फोटो चुकीचा असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी
News Credit :LetsUp Whatsapp message