1. एकच नियम पाळा - कोणताही नियम तोडू नका.
२. प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
३.जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.
४.जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
५.शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
६.लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.
७.गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
८.यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
९.आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
१०.नवीन गोष्ट शिकण्याची ज्याची उमेद गेली तो म्हातारा.
No comments:
Post a Comment